देवगड,दि.०१ मार्च
देवगड तालुक्यातील नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक होऊ नये या साठी देवगड पोलीस स्थानक मार्फत पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ती कोणती खबरदारी घेण्यात यावी याबाबत विशेष जनजागृती मोहीम देवगड एसटी स्टॅण्ड जामसंडे बाजारपेठ तळेबाजार याठिकाणी राबविण्यात आली आणि नागरिकांना याबाबत सविस्तर माहिती तसेच जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.
या प्रसंगी देवगड पोलीस स्थानक पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर,देवगड स्थानक प्रमुख श्रीकांत
सैतवडेकर,सहा. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जोशी,पोलीस हवालदार आशिष कदम,पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील उपस्थित होते.