श्री सरस्वती साईश्वरी संस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात फराळ वाटप

मालवण,दि.२८ ऑक्टोबर

श्री सरस्वती साईश्वरी संस्था, मुंबई यांच्या तर्फे पद्मभूषण पुरस्कार लाभलेल्या समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था या आश्रम मध्ये ९० मुलांना दीपावली निमित्त फराळ वाटप करण्यात आले.

यावेळी श्री सरस्वती साईश्वरी संस्थेचे संस्थापक सुरज बांदकर, सचिन पवार, पुष्पलता मोरे, नरेश करलकर, सुजाता टिकम, लोकेश जैन, नूतन रावराणे आदी उपस्थित होते