विभागस्तरीय क्रिडा स्पर्धेत वामनराव महाडीक विद्यालयाचे सुयश

तळेरे,दि.२८ ऑक्टोबर

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऑक्टोबर 2025 रोजी ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत वामनराव महाडीक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय, तळेरेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत डेरवण येथे होणाऱ्या विभागस्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्ह्य़ाचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
यश प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे,
19 वर्षाखालील मुले/मुली –
1) प्रशिक सुनील कदम 100 मीटर धावणे दुसरा क्रमांक
2) प्रेमांशु मंगेश येझरकर क्रॉस कंट्री चौथा क्रमांक
3) हर्ष नितीन रावराणे क्रॉस कंट्री पाचवा क्रमांक
4) तनश्री संदीप दुधवडकर क्रॉस कंट्री दुसरा क्रमांक
5) 4×100 रिले दुसऱ्या क्रमांक
प्रशिक सुनील कदम,अवधूत तुळशीराम तळेकर,प्रसन्न प्रमोद तळेकर,हर्ष नितीन रावराणे,शुभम सुभाष साटम,
6)साक्षी प्रकाश परब 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक
17 वर्षाखालील मुले
साहिल स्वप्निल पवार 800 मीटर धावणे तृतीय क्रमांक.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रिडा शिक्षक एन.बी.तडवी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे मुख्य.कार्य.अधि.श्रीकृष्ण खटावकर,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शा.स.अध्यक्ष अरविंद महडिक,सर्व शा.स.सदस्य,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्ग,पालक,ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी कौतुकाची थाप देत पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.