विषारी औषध प्राशन केल्याने नांदगाव येथील वैभव मोरये यांचे निधन

कणकवली,दि.२८ ऑक्टोंबर 

नांदगाव सिसयेवाडी वैभव विलास मोरये , (वय ३८) यांनी २६ ऑक्टोंबर रोजी
विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे
उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते . त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता दि-26 ऑक्टोंबर 2025 रोजी जिल्हा रूग्णालय
ओरोस व त्यानंतर लागलीच गोवा बांबुळी रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.
परंतु गोवा बांबुळी रूग्णालय येथे उपचारादरम्यान वैभव विलास मोरये यांचा
27 ऑक्टोंबर रोजी निधन झाले.

वैभव मोरये यांचा टेम्पो व्यवसाय होता. काही महिन्यांपूर्वी एका
बॅंकेकडून त्यांनी कर्ज घेत व्यवसाय सुरु केला. व्यवसायात आवश्यक असलेला
नफा न झाल्याने काही उसणवार कर्ज घेतल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे वैभव मोरये यांनी कोणाच्या दबावाखाली विषारी औषध कोणत्या कारणातून प्राशन करत जीवनाचा शेवट केला आहे का ? जीवन संपविण्यामागे आणखी कुठली कारणे आहेत
का? याबाबत पोलीस तपास करणार आहेत. वैभवच्या दुखद निधनाचे वृत्त समजताच
सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील , आजी ,
२ भाऊ , काका असा परिवार आहे. यापकरणाबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.