वेंगुर्ला ,दि.२९ ऑक्टोबर (प्रथमेश गुरव)
हिरकणी शहर स्तर वेंगुर्ला संघाची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडली. या सभेत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
सभेचे उद्घाटन हिरकणी शहर स्तर संघाच्या अध्यक्ष आकांक्षा परब यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, संगीता कुबल, रमजान मकानदार, स्मिता कोणेकर, मेघा पडते, वैभवी पालव, ऐश्वर्या सावंत, महिमा गावडे यांसह संघाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या सभेत बचत गटांच्या कामाचा आढावा, लेखा परीक्षण आढावा घेण्यात आला. तसेच पीएम स्वनिधी योजनेची जनजागृती, हिरकणी शहर स्तर संघ संचलित शहर उपजिविका केंद्रामार्फत देण्यात येणा-या विविध सेवा याबाबत चर्चा करून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ११० महिलांनी उपस्थित दर्शविली.
फोटोओळी – हिरकणी शहर स्तर संघातर्फे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे यांचे स्वागत करण्यात आले.


