देवगड,दि.२९ ऑक्टोबर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोरे नं.१, ता.वैभववाडी येथील प्राथमिक शिक्षक शंकर अंकुश चव्हाण याना स्वप्नपूर्ती एज्युकेशन संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
स्वप्नपूर्ती एज्युकेशन संस्था जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे या संस्थेच्यावती आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ या पुरस्कारासाठी भारत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोरे नं. १ चे शिक्षक आणि सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय कर्मचारी सहकारी पतपेढी सिंधुदुर्ग चे विद्यमान संचालक शंकर अंकुश चव्हाण यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले अथक परिश्रम त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील निष्ठा व समर्पक भावना सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत असल्याने या बाबतचा आठावा घेऊन स्वप्नपूर्ती एज्युकेशन संस्थेच्या वतीने त्यांची ” राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ ” साठी गौरवपूर्ण निवड करण्यात आली असून त्याना हा पुरस्कार नुकताच. श्री देव मार्तंड देवस्थान जेजुरी, मल्हार नाट्यगृह जेजुरी येथील सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२५ मध्ये मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.यावेळी देव मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणेचे विजयराव कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वप्नपूर्ती एज्युकेशन संस्थेने आपली आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ साठी निवड केल्या बद्दल आपण संस्थेचे ऋणी आहोत. असे सांगुन शिक्षक शंकर चव्हाण यानी संस्थेचे आभार व्यक्त केले


