आदर्श शिक्षण समिती वार्षिक सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

देवगड,दि.२९ ऑक्टोबर
आदर्श शिक्षण समितीच्या कार्यालयाचे काम येत्या पाच ते सहा महिन्यांत सुरू होईल असे मत आदर्श शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यानी व्यक्त केले. ते आदर्श शिक्षण समितीच्या  ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थी गुणगौरव समारंभाच्या अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना बोलत होते . आदर्श शिक्षण समिती देवगड – मुंबई च्या वतीने विद्यार्थांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपुर्ण वातावरणत अध्यक्ष सुरेश पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.
आदर्श शिक्षण समिती देवगड (रजि.) याच्यावतीने देवगड तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वह्या व क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तकांचे वितरण दरवर्षी केले जाते त्याच प्रमाणे  गुणवंत विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्य व शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कमेची शिष्यवृत्ती आणि पारितोषिक दिली जातात. त्याप्रमाणे संस्थेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुंबई येथील श्रीमती शिवराजवती ओंकारनाथ आर्यसमाज सभागृह लोअर परेल-मुंबई येथे आदर्श शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अनंत दाभोळकर, सरचिटणीस भारत पाटणकर, सहचिटणिस गोपीनाथ नेवरेकर , कोषाध्यक्ष राजाराम पवार,गजानन पवार, प्रकट महाराष्ट्र युट्यूब चँनलचे पत्रकार दत्ताराम दळवी, कार्यकारिणी सदस्य प्रकाश पवार, विजय पाटणकर, आण्णा शिरकर,भगवान पाटणकर,  अंतर्गत हिशेब तपासणीस सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री पवार म्हणाले कि, आदर्श शिक्षण समिती देवगड-मुंबई यांच्यावतीने देवगड तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यातच शिक्षणासाठी वह्या वाटप तसेच पहिली पासुन ते महाविद्यालय पर्यतच्या  क्रमिक अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे पहिली ते महाविद्यालयीन परिक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि दर्जेदार असे शैक्षणिक साहित्य व रोख रक्कम  देऊन त्याना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गुणगौरव सोहळा केला जातो हा कार्यक्रम संस्थेचे लेखापरिक्षण वेळेत होऊ शकले नाही तसेच लेखापरीक्षण झाल्या नंतर विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू झाल्या त्यामुळे हा कार्मक्रम दिवाळी दरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. संस्थेच्या कार्यालयासाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू असून  कार्यालयासाठी किती जागा द्यायची याबाबतच्या प्रश्नामुळे हे काम थोडेसे रेंगाळले होते.आता याबाबत सर्व निर्णय घेण्यात आले असून येत्या पाच ते सहा महिन्यांत काम होईल त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. तसेच संस्थेच्या वतीने मोबाईल वर व्हाँट्सप ग्रुप करण्यात आला असून सदर ग्रुपचा वापर हा आदर्श शिक्षण समितीच्या कामकाजासाठी तसेच शैक्षणिक,नोकरी संबंधीतच्या जाहिराती कामासाठीच करण्यात आला असल्याने या ग्रुपवर कोणीही इतर कुठलेही मँसेच कृपया पाठवयचे नाहीत. इतर मँसेजसाठी वेगवेगळे ग्रुप आहेत.त्याचा वापर करावा. असे आवाहन सुरेश पवार यानी केले.
यावेळी उपाध्यक्ष अनंत दाभोळकर यानी प्रास्ताविकातून  सांगितले कि आदर्श शिक्षण समितीच्या स्थापने पासून गेली पंचेचाळीस वर्षे आपण या संस्थेमध्ये काम करत असून संस्थेचे संस्थापक  कै.नारायण गोवळकर तसेच कै.लक्षण पाटणकर यांच्या पश्चात सरचिटणीस शांताराम गोवळकर असताना मी सहचिटणिस होतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था उत्तरोत्तर प्रगती करत असल्याने संस्थेचे कौतुक करत आहे, तसेच यासंस्थेसाठी योगदान दिलेल्या सन्माननीय देणगीदार , हितचिंतक यांचेहि मनापासून कौतुक करतो.यावेळी प्रकट महाराष्ट्र युट्यूब चँनलचे पत्रकार दत्ताराम दळवी , सरचिटणीस भारत पाटणकर, कोषाध्यक्ष राजाराम पवार आदीनी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.  यावेळी पहिली पासून ते महाविद्यालया मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनंत दाभोळकर यानी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार  सरचिटणीस भारत पाटणकर यानी मानले .