सावंतवाडी,दि.२९ ऑक्टोंबर
सावंतवाडी ओवळीये जाणारी एस.टी. बस गेले सहा महिने पुलाचे काम चालू असल्याने बंद होती, त्यामुळे शालेय विद्यार्थी, भाजीपाला घेऊन सावंतवाडी येथे येणारे छोटे मोठे भाजी विक्रेते, प्रवासी यांचे हाल होत होते. एस.टी. महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्री.निलेश गावीत , तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांना दोनसे ग्रामस्थांच्या सह्याचे निवेदन दिले.
यावेळी सगरे ,शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी तातडीने जावून सदर रस्त्याची व पुलाची पाहणी करुन तातडीने रस्ता एस.टी. साठी योग्य आहे म्हणून एस.टी. महामंडळाला पत्र दिले. त्यामुळे ओवळीय गावात एस.टी. जाण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. त्यामुळे विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, ओवळीये गावचे प्रमुख मानकरी सदानंद सावंत, ग्रा.पं. सदस्य सुप्रिया राऊळ, मोहन गवस निवृत्त शिक्षक, सुदाम सावंत, श्रीमती सावंत, सुलोचना गवस, प्रिया गवस, नंदा सावंत, कोमल दळवी, दिपाली राऊळ, राजश्री सावंत, कल्याणी सावंत वगैर ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले


