सावंतवाडी दि.१ मार्च
सावंतवाडी येथील खासकीलवाडा येथे अंगणात शिरलेल्या अजगराला येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मध्ये शिकणारा छोटा पर्यावरण रक्षक कबीर हेरेकर यांने त्याची सुखरूप रित्या सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
आजची पिढी ही मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे व सामाजिक दृष्ट्या असो की शारिरीक दृष्ट्या ही पिढी स्वतःचं बालपण विसरत चालली आहे.यात कबीर हेरेकर हा नेहमीच समाजासमोर वेगवेगळे उदाहरणे सादर करीत आहे. अगदी लहान वयातच त्याने जणू समाज कल्याण व पर्यावरण रक्षणाचा विढाच उचलला आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आज तो ही पर्यावरण प्रेमी व सर्पमित्र म्हणून पुढे येत आहे.
विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना देखील तो आपल्या अभ्यासात देखील उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग खासकीलवाडा येथे अंगणात शिरलेल्या अजगराला छोटा पर्यावरण रक्षक कबीर हेरेकर यांने नैसर्गिक...