सौ. मानसी सरजोशी यांची भाजपा महिला मोर्चा आचरा विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती

आचरा,दि.२९ ऑक्टोबर

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आचरा विभागीय अध्यक्षपदी मानसी यशवंत (मंदार) सरजोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसी सरजोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमुख कार्यकर्त्या आहात. आपण आपल्या कार्यक्षेत्रात जनतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

आपल्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी विभागीय अध्यक्ष या पदासाठी आपली निवड करत आहे.

आपले हे योगदान भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा ! असे नियुक्तीपत्र मानसी सरजोशी यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाजपा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.