कळसुली गवसवाडी लिंगेश्वर मंदिर येथे २ मार्च रोजी हरीनाम सप्ताह

कणकवली दि .१ मार्च(भगवान लोके)

कळसुली गवसवाडी येथील लिंगेश्वर मंदिर येथे वार्षिक एकदिवसीय अखंड हरिनाम सप्ताह शनिवार 2 मार्च रोजी होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी 10 वाजता घटस्थापना, साडेदहा ते साडेतीन वाजेपर्यंत तिर्थ प्रसाद व स्थानिक वारकरी भजने, दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत वाडीतील सुश्राव्य भजने, संध्याकाळी साडेसहा ते रात्री आठ वाजेपर्यंत वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ, सादर होणार आहे.

रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत दिर्बादेवी प्रासादिक भजन मंडळ,वरवडे यांचे सुश्राव्य भजन, रात्री साडेनऊ वाजता विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ, मठ बुद्रुक बुवा श्री.उमेश पेडणेकर यांचे सुश्राव्य भजन, रात्री दहा वाजता मान्यवरांचे स्वागत, सत्कार व देणगीदारांचे आभार सोहळा, त्यानंतर सुश्राव्य दिंडी भजने सादर होणार आहेत.

खास आकर्षण दिंडी भजन, श्री.विठ्ठल रखुमाई दिंडी भजन,आचरा देऊळवाडी बुवा श्री.लवू घाडी, आणि श्री.पावणादेवी प्रासादिक दिंडी भजन मंडळ किंजवडे परबवाडी बुवा श्री.विलास बगाड दिंडी भजन सादर करणार आहेत.

रविवार 3 मार्च रोजी सकाळी 8 वाजता बाल गोपाळांचे खेळ,9 वाजता नवस फेडणे,नवस बोलणे, सकाळी 10 वाजता गोपाळ काला,10:30 वाजता वाजत गाजत घटाचे विसर्जन दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.

भाविक भक्तांनी हरीनाम सप्ताह कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन कळसुली गवसवाडी ग्रामस्थ आणि श्री.लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ लिंगेश्वर नगर गवसवाडी यांनी केले आहे.