वेळागर लिंगेश्वराचा वर्धापनदिन ३ मार्च रोजी

वेंगुर्ला ,दि .१ मार्च

शिरोडा- वेळागर श्री देव लिंगेश्वर मंदिर मंदिराचा २१ वा वर्धापन दिन रविवार दि. ३ मार्च रोजी विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून संपन्न होणार आहे.
त्यानिमित्त सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, लघुरुद्र, सकाळी ९ वाजता वरदशंकर महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद, संध्याकाळी ६ ते ७ वाजता भाविकांची भजने, रात्रौ ७ वाजता पालखी, रात्रौ ८ ते ९ वाजता बक्षिस वितरण, रात्रौ १० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच महाशिवरात्री उत्सव शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, अभिषेक, संध्याकाळी ४ वाजता किर्तन, रात्री ७ वाजता पालखी, रात्री ८ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
लिंगेश्वर मंदिरांत होणा-या या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा भाविकांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती व सल्लागार यांचेतर्फे करण्यात आले आहे.