दिवाळी अंक कथालेखन स्पर्धांमध्ये प्रा. नागेश कदम यांचे सुयश

मालवण,दि.३१ ऑक्टोबर

अद्वैत दिवाळी अंकातर्फे आयोजित आंतरजिल्हा कथालेखन स्पर्धेत मालवण येथील डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश कदम यांच्या ‘आधार’ या कथेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच मुंबई येथील मोडी लिपी दर्पण या दिवाळी अंक स्पर्धेत प्रा. नागेश कदम यांच्या ‘वंश’ या कथेला राज्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

प्रा. नागेश कदम हे राज्यस्तरावर उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. तसेच शासनाने त्यांची अभ्यासक्रम समितीवर सदस्य म्हणून निवड केली आहे. प्रा. नागेश कदम यांनी आजपर्यंत १५० पेक्षा जास्त निबंधलेखन केले आहे. अनेक निबंधांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांच्या अनेक कथा कविता, निबंध संशोधने यांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. प्रा. नागेश यांनी दिवाळी अंक स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल डी. एड. कॉलेजचे प्राचार्य हेमंत प्रभू, संस्थेचे कार्यवाही साईनाथ चव्हाण, सचिव गणेश कुशे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.