कणकवली शहरासाठी विकासनिधीचे ‘दिवाळी गिफ्ट’

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बंडू हर्णे यांची माहिती : ३७ कामांसाठी १० कोटींचा निधी, खा. राणे, मंत्री राणेंचा मानले आभार

कणकवली,दि.३१ ऑक्टोंबर

कणकवली शहरात २०२५-२६ या वर्षासाठी विविध विकासकामांसाठी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरात ३७ विकासकामे होणार आहे. कणकवलीकारांना खा. राणे, पालकमंत्री राणे यांनी दिलेले ‘दिवाळी गिफ्ट’ आहे. विकासकामांसाठी निधी दिल्याबद्दल खा. राणे, मंत्री राणे यांचे कणकवली शहरवासीयांतर्फे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी शहर भाजप कार्यालयात आयोजित घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आभार मानले. यावेळी शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे उपस्थित होते.
टेंबवाडी (हिंद छात्रालय ते रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी १२ मीटर डी.पी रस्त्याकरिता जमिनीचे उर्वरित क्षेत्र भू संपादन करण्यासाठी १ कोटी रुपये, निम्मेवाडी बाईत घर रस्ता डांबरीकरण्यासाठी ७ लाख रु., नरडवे रोड मोहन माळ येथील वहाळालगत संरक्षक भित बांधण्यासाठी ६ लाख रु., टेंबवाडी येथील नवीन रस्त्यालगत सोलार पथदीप उभारण्यासाठी १० लाख रु. बिजलीनगर हिर्लेकर सर्व्हिसिंग सेंटर नजीक गटार बांधण्यासाठी ११ लाख ५० हजार रु., हर्णेआळी हेमंत उपरकर चाळ ते आरोलकर कापाऊंडपर्यंत गटार बांधण्यासाठी १० लाख रु. शहरात विविध ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यासाठी २० लाख रु. शहरातील रिंगरोड फेज १ व २ येथे सोलार पथदीप उभारण्यासाठी ३५ लाख रु. परबवाडी संतोष पवार घर ते जुन्या नरडवे रस्त्यापर्यंत फुटपाथ व गटार बांधकाम करण्यासाठी २५ लाख रु. , परबवाडीतील रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी १३ लाख रु., एसटी वर्कशॉकडे जाणाºया रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासाठी ७ लाख रु., मराठा मंडळ येथे गणेश घाट बांधण्यासाठी ७० लाख रु., तांडेल कॉम्प्लेक्स शेजारील गटार बांधण्यासाठी १३ लाख ६० हजार रु., परबवाडी येथे गणपती सान्याचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी १८ लाख ८५ हजार रु., बाजारपेठेसाठी असलेल्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यासाठी १६ लाख रु., गणपती साना रस्ता कांदळकर घर ते कला महाविद्यालयपर्यंत दोन्ही बाजूने गटार बांधण्यासाठी ३० लाख रु. , तेलीआळी कस्टम आॅफिसलगत गटार बांधण्यासाठी १० लाख रु., तेलीआळी येथील रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण्यासाठी १४ लाख ६५ हजार रु., बाजारपेठेतील हरिश्चंद्र हॉटेल व लाड घरपर्यंत गटार बांधण्यासाठी १५ लाख रु., आप्पासाहेब पटवर्धन चौक (आचरा रोड) ते मसुरकर किनई रोडपर्यंत रस्ता नूतनीकरण करण्यासाठी २५ लाख रु., बाजारपेठ महापुरुष मंदिर मागील बाजूने गटार बांधण्यासाठी ४० लाख रु, कनकनगर येथील सावंत घर ते शिखरे घरापर्यंत गटार बांधण्यासाठी १० लाख रु., जळकेवाडी येथील स्मशानभूमीत संरक्षक भिंत व शेड बांधकाम, इतर कामांसाठी ५० लाख रु., टेंबवाडी येथे रस्त्यालगत गटार बांधण्यासाठी १० लाख रु., कणकवली नगरपंचायत सभागृह व परिसर नूतनीकरण करण्यासाठी ५० लाख रु., न. पं. हद्दीत बगीचा व सुशोभिकरण, पायाभूत सुविधांसाठी १ कोटी ५ लाख रु., कनकनगर येथील ब्राह्मणदेव स्थान शेजारीला पाईप गटार बांधकाम करण्यासाठी ५ लाख रु., तेलीआळी ते सह््याद्री हॉटेल रस्ता नूतनीकरण करण्यासाठी १० लाख रु., मुरकर घर ते शाळा नं ५ रस्ता नूतनीकरण करण्यासाठी २० लाख रु., निम्मेवाडी दुखंडे घराशेजारील पांदण बांधकाम करण्यासाठी २० लाख रु., न. पं. आरक्षण क्रमांक २७ ते २८ येथील क्रीडा सुविधा केंद्र येथे वुडन कोर्ट करून मॅट बसविण्यासाठी ३० लाख रु., मराठा मंडळ येथील उर्वरित नूतनीकरण करण्यासाठी १० लाख रु., बांधकरवाडी येथे पांदण बांधकाम व रस्ता बांधकाम करण्यासाठी ३० लाख रु., सुतारवाडी येथील राणे सृष्टी ते धुरी घरापर्यंत रस्ता करण्यासाठी ३९ लाख ७९ हजार रु., मसुरकर किनई रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी ३९ लाख ९२ हजार रु., तर पर्यटन स्थळ विकास योजना अंतर्गत माऊली नदी परिसर सुशोभिकरणासाठी ५३ लाख १० हजार रु., छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांचा पुतळा व परिसर सुशोभिकरण्यासाठी ४० लाख रु. असा एकूण १० कोटी ६५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रशासकीय मंजूर मिळाल्यानंतर पुढील वर्षी ही कामे सुरू होणार आहेत, असे नलावडे व हर्णे यांनी सांगितले.
चौकट
छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी ४० लाखांचा निधी
कणकवली शहरातील विकासकामांसाठी सन २०२५ – २६ या वर्षांसाठी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून व शासनाच्या महाराष्टÑ सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १० कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांचा पुतळा व परिसरस सुशोभीकरणासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे समीर नलावडे यांनी सांगितले.