दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी गिरणी कामगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला !

मुंबई,दि.३१ ऑक्टोबर

शेलु-वांगणी येथील घर स्वीकारले नाही तर घराचा हक्क हिरावून घेणा-या १५ मार्चच्या शासन निर्णयातील कलम क्र.१७ रद्द करून,सुधारित निर्णय जाहीर करावा आणि मुंबईतच घरे देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी,याचे स्मरण करून देण्यासाठी रविवार दि.९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता संयुक्त लढा समितीच्या वतीने गिरणी कामगार मोठ्या संख्येने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे (पश्चिम)येथील निवासस्थानी भेटीला जाणार,असा निर्णय घराच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे!
९ जुलै रोजीच्या गिरणी कामगारांच्या यशस्वी लढ्याच्या पार्श्वभूमीवर,१० जुलै रोजी विधानभवन मध्ये गिरणी कामगार लढा समितीचे प्रमुख,आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गिरणी कामगार नेत्यांच्या बैठकीत वरील प्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते.त्याची आठवण करून देण्यासाठी गिरणी कामगार उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत.
आजच्या बैठकीत लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते,विजय कुलकर्णी, हेमंत गोसावी, रमाकांत बने, विवेकानंद बेलोसे,ऍड.बबन मोरे, आनंद मोरे,हरिनाथ तिवारी,अरुण निंबाळ कर,दिलीप सावंत,निवृत्ती देसाई,संतोष सावंत,सुधीर निकम,वैशाली गिरकर आदीनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला.