लिगेश्वर देवस्थान अध्यक्षपदी जगन्नाथ डोंगरे

वेंगुर्ला,दि .१ मार्च

शिरोडा वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वर देवस्थान अध्यक्षपदी जगन्नाथ डोंगरे, उपाध्यक्षपदी प्रदीप भगत, सचिवपदी दिलीप गवंडी, खजिनदारपदी विजयकुमार शिरगांवकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
शिरोडा वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वर मंदिरात देवस्थान समितीची सन २०२४ ते २०२८ या पंचवार्षिक निवडीची सभा संस्थापक अध्यक्ष शंकरभाई कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात संचालकपदी श्रीकृष्ण पडवळ, संदिप धानजी, अनिल कुडव, हेमंत रेडकर, उदय मिशाळ, प्रसाद सुर्याजी, आनंद नाईक, पांडुरंग नाईक, तानाजी मयेकर, जनार्दन पडवळ, मदन अमरे (पुजारी) यांची तर सल्लागारपदी संस्थापक अध्यक्ष शंकरभाई कांबळी, दिनेश बर्डे, भाई रेडकर, विजय पडवळ, मनोहर होडावडेकर आदींचा समावेश आहे.