कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी संदीप रामचंद्र सावंत यांची निवड

तळेरे, दि .१ मार्च

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी संदीप रामचंद्र सावंत यांची नव्याने निवड करण्यात आली आहे.
संदीप सावंत हे मालवण तालुक्यातील पोईप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत. तसेच आदर्श रिक्षा संघटना-पोईपचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर व उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर यांनी संदीप सावंत यांची मालवण तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. तसेच संदीप सावंत यांचे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व सहसचिव सुधीर पराडकर यांनी यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.