देवगड,दि.१३ जानेवारी
महिंद्रा कंपनीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन मिळावे त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील कल्पनाशक्तीला वाव मिळावा या उद्देशाने देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जेट टॉईज प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी मांडले.
याप्रसंगी व्यासपीठावर महिंद्रा कंपनीचे प्रतिनिधी संजय मालप समीर माडये,समिर वंजारे, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री भागोजी जोईल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
आपले विचार व्यक्त करताना श्री राऊत पुढे म्हणाले, महिंद्रा कंपनीने कोरोना काळात केलेले आरोग्य विषयक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी घेण्यात आलेली प्रशिक्षणे ,स्पर्धा ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत कंपनीने देवगड तालुक्यामध्ये विभाग वार अशा प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घ्यावेत .जेणेकरून तालुक्यातून या निमित्ताने अनेक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये उज्वल यश प्राप्त करतील . आपल्या कल्पनाशक्तीने व कौशल्याने विविध गाड्याच्या प्रतिकृती तयार करतील. याचा निश्चितच फायदा महिंद्रा कंपनी बरोबरच देशालाही होईल .आपला देश याही क्षेत्रात अधिक प्रगतिशील होईल विद्यार्थीही माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्रात निश्चितच उज्वल यश प्राप्त करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ माने यांनी केले तसेच प्रास्ताविक समीर वंजारे यांनी केले.
या प्रशिक्षण वर्गामध्ये कुणकेश्वर कातवण, टेंबवली कालवी, कुणकेश्वर नं1, कोटकामते नं1 पाट थर , जामसंडे नं1 ,इळये नं1 तारा मुंबरी,आरे देवीची वाडी, कुवळे नं1 अशा एकूण दहा शाळांनी या प्रशिक्षण वर्गात सहभाग घेतला होता. महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक सुबोध मोरये यांनी हा प्रशिक्षण वर्ग देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यां साठी आयोजित करण्यासाठी विशेष मेहनत घेतली .प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी सौ राजश्री मोडकर,सोमनाथ माने ,मनोहर मुंणगेकर ,संदीप परब, भूषण कुमार जगताप ,वसंत शेट्ये ,नम्रता कांबळी, वैशाली पवार ,तात्या लवटे, नंदकुमार येरागी या शिक्षकांनी विशेष योगदान दिले. यानंतर शाळांना टॉईज निर्मितीसाठी आवश्यक असणारे कीट देण्यात आले. त्यानुसार शाळांकडून टाॅईजच्या प्रतिकृती
करून घेण्यात आल्या . या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.