तांबळडेग येथे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन!

देवगड,दि.१ मार्च

देव महापुरुष तांबळडेग , उत्तरवाडा विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जागर महादेवाचा करण्याचा रिवाज पूर्व परंपरागत केला जातो. या सोहळ्याचे औचित्य साधून दि. ७ मार्च रोजी उपरोक्त मंडळाच्या वतीने या निमित्ताने जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तरी दि. ६ मार्च संध्याकाळ पर्यंत इच्छुक स्पर्धकांनी दिप्तेश कोयंडे यांच्या 9404325343 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये आणि चषक, द्वितीय पारितोषिक दोन हजार व चषक, तृतीय पारितोषिक एक हजार आणि चषक अशी मोठा गट व लहान गटासाठी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. असे मंडळाचे अध्यक्ष रमाकांत सनये, उत्सवमूर्ती निलेश प्रभू यांनी सांगितले असून 9405928174, 9405216749 या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.