पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि .१ मार्च

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि.2 ते 3 मार्च 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.2 मार्च 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता आंगणेवाडी ता. मालवण येथे आगमन. सायं. 5 वाजता आई भराडी देवी दर्शन. सायं.6 वाजता आंगणेवाडी येथे राखीव. रात्री 10 वाजता आंगणेवाडी येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. रात्री 11.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव.

रविवार दि. 3 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता केसरी येथून सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता सावंतवाडी पोलीस मैदान येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.