आंबोली,दि.१ मार्च
येथील जंगलात शिकारीचे सत्र सुरूच असल्याचे काल पुन्हा निष्पन्न झाले. रात्री वनविभागाला कळवण्यात आले मात्र त्यांनी तसे काही दिसले नसल्याचे सांगितले. आंबोली पेरीचे भाटले येथे १६ दिवसापासून साखळी उपोषण सुरू असल्याने सध्या दिवस आणि रात्री महिला आणि पुरुष तिथे उपोषणला बसतात त्यामुळे ग्रामस्थांची रात्र जागरण असते. तसेच रात्री पहारा असतो. रात्री येथून जवळच जुगू यमकर यांच्या घराजवळ शिकाऱ्यानी बंदुकीचा पेठ घातल्याचा आवाज आला.तसेच बॅटरी ही दिसून आली. यानंतर त्यांनी वनविभाग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपोषणकर्ते राकेश अमृस्कर वैगेरे ग्रामस्थानी कळवल्यानंतर अनिल चव्हाण यांनी वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांना रात्री पावणे अकरा वाजता माहिती दिली. त्यावेळी त्यांनी स्टाफ पाठवतो असे सांगितले.साडे अकरा वाजता पुन्हा जवळच पेठ घातल्याचा दुसरा आवाज आला.
दरम्यान वन विभागाने त्या परिसरावर टेहळणी केली असता टॉर्च लाईट आणि शिकारी आढळले नसल्याचे रात्री १२ वाजता घोडके यांनी सांगितले. दरम्यान वनक्षेत्रपाल सौ.घोडके या वनाधिकारी या ठिकाणी जबाबदारीने चांगले काम करत असल्याचे दिसून आले.
आंबोलीत सावंतवाडी भागातून शिकारी सवकलेले आणि निर्ढावलेले येत असतात व्यावसायिक उद्देशाने शिकारी करतात का याचाही सखोल तपास होणे आवश्यक आहे.नऊ दिवसांपूर्वीच सावंतवाडी बांदा भागातील काही शिकारी पकडले होते. त्यामुळे वनखात्याने रात्रीच्या वेळी सजग होण्याची गरज निर्माण झाली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.