जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर  

सिंधुदुर्ग,दि.०४ नोव्हेंबर
  भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के  व  243 झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद, मालवण  नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे.
• नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक  10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी
• चिन्ह वाटप दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी
• मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यत
• मतमोजणीचा दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी
• मतमोजणीचा निकाल राजपत्रमध्ये प्रसिध्द करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी
  निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम निर्गमित केलेल्या वेळेपासून लागू झाली असून  ती निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यत अंमलात राहील. वरील आचारसंहिता सार्वत्रिक निवडणुकांकरीता नगरपरिषदा,  नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर प्रलोभन देणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही.
अधिकच्या माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या https://mahasecelec.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.