सावंतवाडी,दि.०४ नोव्हेंबर
आरोस गावचे सुपुत्र व गेली बरीच वर्षे मळगाव येथे वास्तव्यास असलेले राजन धोंडू पटेकर (वय ६५) यांचे मंगळवारी पहाटे ५.०० वाजता सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. आरोग्य विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी मधून विस्तार अधिकारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.
गेले चार दिवस त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. परंतु सोमवारी सायंकाळी त्यांची तब्बेत जास्तच खालावल्याने त्यांना सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर मळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे धनराज उर्फ अमेय व गौरव, सुना असा परिवार आहे.


