पारगड- मोर्ले रस्त्यासाठी पुन्हा उपोषणाची गरज पडणार नाही -आमदार राजेश पाटील

स्टेट हायवे म्हणून मान्यता, लवकरच कामाचा शुभारंभ

दोडामार्ग, दि. १ मार्च

पारगड- मोर्ले रस्ता कामाच्या पूर्ततेसाठी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. दीपक केसरकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना रवींद्र चव्हाण यांच्यासोबत या कामाचा लवकरच शुभारंभ करणार आहोत. असे प्रतिपादन चंदगड चे आमदार राजेश पाटील यांनी केले. पारगड किल्ल्यावरील पारगडचे पहिले किल्लेदार ‘सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे’ यांच्या स्मारकाचे लोकार्पण प्रसंगी पाणी व रस्ता संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.