देवगड खाडीपात्रात पडून खलाशी मयत !

देवगड,दि. १ मार्च
देवगड बंदरात मासेमारी नौकेवर कामाला असलेला युवक दीपक कृष्णा मुळ्ये रा हुंबरट ता.कणकवली हे देवगड येथील खाडीच्या पाण्यात तोल जाऊन पडून मयत झाला असल्याची घटना २९ फेब्रुवारी सायं.७ च्या सुमारास घडली आहे.देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूचू नोंद करण्यात आली असून या घटनेची फिर्याद ज्योती प्रकाश पवार यांनी देवगड पोलिस स्थानकात दाखल केली आहे .
दीपक मुळ्ये हे दाऊद सोलकर यांच्या अलनाहीद- १ एक या नौकेवर नोकरी करीत होते .२९ फेब्रु ला सायंकाळी ७ च्या सुमारास ते नापत्ता झाले त्यांच्या मृतदेह १ मार्च सकाळी आढळून आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत.