देवगड,दि. १ मार्च
तालुक्यातील मोंडपार पुजारे वाडी येथे देवगड आगाराची देवगड तरळा प्रवासी फेरी (एम.एच.२०-बी एल ४२०) मारुती ओमनी एम एच ४८एस-२९३१ याची धडक होऊन ओमनी मधील महेश कृष्णा घाडी ,अनिकेत रवींद्र अनभवणे,रा. मोंड गावठण याना किरकोळ दुखापत झाल्याची घटना १मार्च दु.१.४५ च्या मानाने घडली.
या अपघातस्थळी देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी भेट देऊन माहिती घेतली.देवगड पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा करण्यात येऊन सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू होती.