कणकवली दि.६ नोव्हेंबर
ग्रामपंचायत लोरे नं.1 आणि एस. एस .पी. एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमानाने 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर अंतर्गत आरोग्य या उपक्रमाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिर 6 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय लोरे नं.1 येथे आयोजित करण्यात आले. आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,जनरल सर्जरी ,नेत्र तपासणी ,न्यूरोलॉजी ,युरोलॉजी कर्करोग, अस्थिरोग, प्रस्तुती शास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी तसेच मोफत रक्त तपासणी या आरोग्य विषयक तपासणी समाविष्ट होत्या त्यासाठी एस.एस.पी.एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथील डॉ.सुधीर सांबरे , मेडिसिन ,डॉ.संजय जोशी – आय स्पेशालिस्ट, डॉ.देवानंद उमटे -ऑर्थोपेडिक, डॉ.अपेक्षा कुबल गायनॅकॉलॉजिस्ट तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी ही उपस्थित होते.
यावेळी सरपंच अजय रावराणे म्हणाले, तपासणी सर्वांसाठी मोफत आयोजित केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून 35 नेत्र तपासणी, 7 स्त्री रोग तपासणी, व अन्य 62 असे एकूण मिळून 104 लाभार्थ्यांनी लाभ घेतला .
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य कर्मचारी यांनी मेहनत घेतली.



