कुंदे गावात आ. वैभव नाईक यांची विकास कामांची वचनपूर्ती

0

४५ लाखांच्या विविध विकास कामांची केली भूमिपूजने

कुडाळ,दि.१३ जानेवारी
आमदार वैभव नाईक यांनी कुंदे गावात विकास कामांचे दिलेले वचन पूर्ण केले असून काल शुक्रवारी विविध विकास कामांची भूमिपूजने त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामध्ये जनसुविधा २०२२-२३ अंतर्गत कुंदे मुख्य रस्ता ते आंबेडकरनगर भटवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे निधी १० लाख, बजेट अंतर्गत कुंदे मुख्य रस्ता ते आंबेडकरनगर भटवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे ९ लाख, जि.प.शाळा कुंदे नं. १ येथे नविन २ वर्गखोली बांधकाम करणे २४ लाख, १५ वित्त आयोग अंतर्गत कुंदे मुख्य रस्ता ते महादेव परबवाडी रामचंद्र कदम यांच्या घराजवळ जाणारा रस्ता खडीकरण २.२३ लाख हि कामे करण्यात येणार आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचा सत्कार करत आभार मानले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन कदम, शाखा प्रमुख विरेश परब,कुंदे सरपंच रुपेश तायशेटे,उपसरपंच उल्का खांदारे, ग्रा. प. सदस्य राजू शिंदे, ग्रा. प. सदस्या सुनैना पवार,संदीप राणे, अणा राणे, वासुदेव राणे,तानाजी राणे,विलास कदम, सुभाष खांदारे,भिवा खांदारे,किरण बांबर्डेकर, संचित बागवे,सिद्धेश कदम, राकेश कदम,आयुष परब,सुनील पवार,महेंद्र पवार,समिता कुंठे,अजय राणे, महेंद्र पवार, जितेंद्र परब, संतोष खांदारे, बाळा गावडे, नागेश पवार, आदित्य कुंदेकर, चेतन बांदेकर, संतोष टायशेटे, भानुदास ताईशेटे, विजय परब नाना पेडणेकर, दाजी खांदारे, सुरेश राणे, गुरुनाथ कदम, अक्षय पवार, दीपक पवार,संजय कुंटे,मंगेश सावंत, कृष्णा घाडी, सुनिता बांदेलकर, सुमित्रा गावडे यांसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.