आनंदाची बातमी, कणकवली शहरात लवकरच सीएनजी पंप सुरु होणार

कणकवली दि.६ नोव्हेंबर

कणकवली वासियांसाठी शहरातील लवकरच सीएनजी पंप सुरु होणार आहे. शहरातील बस स्टँडच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर गुरुवारी सीएनजी भरण्यासाठी यशस्वी चाचणी पार पडली.

सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सीएनजी गाड्यांमध्ये भरण्यात आला.त्यामुळे लवकरच लवकर कणकवली शहरांमध्ये सीएनजी पेट्रोल पंप सुरु होणार आहे. त्यामुळे कणकवली शहरातील सीएनजी वाहन चालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण रिक्षा व्यवसायिक आणि कारचालक हे सीएनजी भरण्यासाठी सिंधुदुर्ग नगरी, फोंडाघाट , तरळे या ठिकाणी जातात. पण आता शहरातील सीएनजी पंप काही दिवसात सुरू होणार असल्याचे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.