महानाट्य “अयोद्ध्या ” भारतातील अलौकिक धर्मयुद्ध या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्या शुभहस्ते

देवगड वासियांकडून महानाट्य “अयोद्ध्या ” उस्फुर्त असा प्रतिसाद

देवगड,दि.०१ मार्च
आम.नितेश राणे यांच्या सौजन्याने सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट सादर
महानाट्य “अयोद्ध्या ” भारतातील अलौकिक धर्मयुद्ध या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.रंगमंचाचा शुभारंभ जेष्ठ कारसेवक दामोदर अभ्यंकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून जामसंडे येथे पार पडला.
लेखन व दिग्दर्शन केदार देसाई ,निर्मिती प्रणय देसाई या प्रसंगी माजी आम.अजित गोगटे,भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,जिल्हा निमंत्रित सदस्य बाळ खडपे,प्रकाश राणे, जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस,भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर सरचिटणीस शरद ठुकरुल,भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर ,युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील,निर्माते प्रणय तेली माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर ,वैभव करंगुटकर,गणपत गावकर,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,स्वीकृत नगरसेवक व्ही.सी .खडपकर,नगरसेविका तन्वी चांदोस्कर,प्रणाली माने,प्राजक्ता घाडी तन्वी शिंदे ,संतोष फाटक,राजू शेट्ये,महिला अध्यक्ष उषकला केळुसकर माजी जि प सदस्या मनस्वी घारे,एकनाथ तेली दामोदर अभ्यंकर,रवींद्र चिंदरकर मिलिंद माने देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक,नगरसेविका अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते
या वेळी माजी आम.अजित गोगटे कारसेवक दामोदर अभ्यंकर निर्माते प्रणय तेली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी दामोदर अभ्यंकर यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.