दीक्षित फाऊंडेशनच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी श्रीमद्भगवद्गीता अध्याय पाठांतर स्पर्धा २०२५ चे आयोजन

देवगड,दि.०८ नोव्हेंबर

दीक्षित फाऊंडेशनच्यावतीने वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. श्रीमद्भगवद्गीता अध्याय पाठांतर स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. कै. नीता निळकंठ दीक्षित स्मरणार्थ व वेदमूर्ती कै. श्रीपाद काळे स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा ‘संस्कृती संवर्धनातून कौशल्य विकास’ या ब्रीदवाक्याला अनुसरुन पार पडणार आहे.

या स्पर्धेत इयत्ता तिसरीपर्यंतचा बालगट, इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतचा पहिला गट आणि इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचा दुसरा गट अशा तीन गटात होणार आहे. बालगटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे एक हजार रू., ७५० रू., ५०० रू. तसेच स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, पहिल्या गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय व मांकासाठी अनुक्रमे एक हजार रू., ७५० रू., ५०० रू. तसेच स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, तर दुसऱ्या गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १,५०० रू., १ हजार रू., ७५० रू. तसेच स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तीनही गटातील उत्तेजनार्थ क्रमांकांना ५०० रू. चे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यावर स्पर्धकांना स्पर्धेसाठी नेमलेल्या अध्यायाची ऑडिओ क्लिप आणि पीडीएफ प्रत देण्यात येईल. त्याआधारे पाठांतर करावे. उच्चार शुद्ध आणि ऑडिओ क्लिपप्रमाणे स्वरबद्ध असणे आवश्यक आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी स्पर्धा समन्वयक भूषण दातार (८०८७८६८८८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दीक्षित फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.