शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात मिळवले यश
कणकवली दि.१ मार्च(भगवान लोके)
जि. प. शाळा कलमठ बाजारपेठ क्र.१ या शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्या निमत्ताने कुडाळ – मालवण आमदार वैभव नाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी शाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
आमदार वैभव नाईक यांनी कलमठ बाजारपेठ शाळा क्र.१ मुख्याध्यापक
श्रीमती मधुरा सावंत ,श्री.प्रमोद पवार सर,
श्री.प्रदीप मांजरेकर सर,शिक्षिका
श्रीमती विद्या लोकरे,
श्रीमती इंदू डगरे ,
शाळा व्यवस्थापन समिती चे श्री.अमोल कोरगांवकर
आणि श्री.नंदकुमार हजारे गुरूजी यांचे कौतुक करत शाळेची पाहणी केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी रामदास विखाळे -उद्योजक,श्री.किरण हुण्णरे
श्री.निसार शेख माजी सरपंच, कलमठ,श्री.विलास गुडेकर ,श्री. धीरज श्रीधर मेस्त्री(ग्रामपंचायत सदस्य, कलमठ),श्री.सचिन खोचरे
(ग्रामपंचायत सदस्य, कलमठ),श्री.अर्चना कोरगांवकर,श्री.इम्तियाज फकीर,श्री.सुशील कोरगांवकर ,श्री.राजू कोरगांवकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.