माजी नगरसेवक संजय कामतेकर ;कणकवलीत वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन
कणकवली दि.१ मार्च(भगवान लोके)
हातमाग पासून बनवलेली वस्त्र अलीकडच्या काळात कमी होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हातमाग वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शनाचे आयोजन केले हे कौतुकाची बाब आहे,असे प्रतिपादन माजी नगरसेवक संजय कामतेकर यांनी केले.
वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने लक्ष्मी विष्णु मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन शुक्रवारी उद्योजक सतीश नाईक व माजी नगरसेवक संजय कामतेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप आचरेकर, महाटेक्सचे मार्केटिंग मॅनेजर सुरेश जाधव, विधुरा इव्हेंटचे प्रकाश पारीक, विशाल पटेल आदी उपस्थित होते. सतीश नाईक यांनी हातमाग प्रदर्शन व विक्री करणारा व्यवसायिकांना शुभेच्छा दिल्या.
सुरेश जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील गरिब व होतकरू हातमाग वस्त्र विणकर आहेत. ज्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही अशा गरीब व होतकरू विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हातमाग विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर हातमागाचा प्रचार व भारतीय संस्कृतीचा प्रसार व्हावा या उद्देशाने महाराष्ट्रभर अशा प्रकारचे प्रदर्शन भरवण्यात येत आहेत. असे सुरेश जाधव यांनी सांगितले. हे हातमाग प्रदर्शन १ ते ८ मार्च यादरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील तेरा संस्थांनी सहभाग घेतला आहे.