शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे माजी संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर शिवसेनेत

शिवसेना नेते किरण सामंत यांनी कार्यकर्त्यांच्या घेतल्या गाठीभेटी ; लोकसभेच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला वेग

कणकवली दि. २ मार्च ( भगवान लोके )
शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे कणकवली तालुका माजी संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी शिवसेना नेते , रत्नसिंधु समृद्धी योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. लोकसभेच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. शिवसेना नेते व लोकसभेचे संभाव्य उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी कणकवली येथील शिवसेना कार्यालयात सकाळपासूनच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामुळे लोकसभेची जोरदार मोर्चे बांधणी किरण सामंत करताना दिसत आहेत.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात शंकर पार्सेकर यांनी प्रवेश केला. शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर शंकर पार्सेकर हे काही काळ तटस्थ राहिले होते. त्यानंतर त्यांनी हा प्रवेशाचा निर्णय घेतला . यावेळी त्यांच्या समवेत काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर , शिवसेना जिल्हा खजिनदार भास्कर राणे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख एम.एम सावंत , तालुका समन्वयक सुनील पारकर, शहरप्रमुख बाळू पारकर , प्रशांत वनसकर , दिलीप घाडीगांवर , चिन्मय राणे , सुनील सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात किरण सामंत यांनी आंगणेवाडी देवी भराडी मातेच्या दर्शनानिमित्त भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विविध समस्या घेवून काही नागरिकांनी निवेदने दिली. तसेच कुणकेश्वर देवस्थान संस्थानच्यावतीने श्री. सामंत यांना देण्यात आले. त्यानंतर आलेल्या शिवसैनिकांशी किरण सामंत यांनी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आला रे… कोण आला … शिवसेनेचा वाघ आला , शिवसेना जिंदाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या .