जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा नगरसेवक विशाल मांजरेकर यांचे आवाहन
देवगड,दि.१३ जानेवारी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरसेवक तथा देवगड जामसंडे नगरपंचायत आरोग्य सभापती विशाल विकास मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बी. के.एल.वालावलकर रुग्णालय डेरवण,चिपळूण यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर मंगळवार दि.१६ जाने. रोजी स.९ ते दु.२ या वेळात इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी देवगड येथे आयोजित केले आहे.
: या शिबिरात सर्जन,अस्थिरीगतज्ञ,नेत्र रोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ,जनरल मेडिसिन,नाक कान घसा तज्ञ उपस्थित राहणार असून तपासणी दरम्यान रुग्ण आढळल्यास शस्त्रक्रिया करण्यास योग्य पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
सोबत मूळ रेशन कार्ड,ओळखपत्र,जुने तपासणी रिपोर्ट घेऊन यावे.
या शिबिरात हर्निया,पित्ताशयातील खडे,थायरॉईड फायबरोडेनोमा, प्रोटेस्ट ग्रंथी,मूळव्याध,नाकाचा हाड वाढणे,मोतीबिंदू,मुतखडा,चरबी च्या गाठी,स्तनाचा कॅन्सर ,टॉन्सिल्स,अल्सर,अपेनडिक्स, कानाच्या पडद्याची तपासणी,तोंडाचा कॅन्सर नाक कान घसा,।महिलांची गर्भाशय शस्त्रक्रिया या तपासण्या होणार आहेत.,तरी या शीबिराच्या नोंदणी करिता महेंद्र भुजबळ9356365808, सूरज आचरेकर 7057557716,योगेश गोळम,9960550468,बाळा कणेरकर9423834177,रुपेश साठे,9405497727,गोट्या डोंगरकर 7620962610 यांचेशी संपर्क साधावा.