सावंतवाडी,दि.२ मार्च
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा उद्या रविवार दि.३ मार्च २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, तथा मुंबई शहराचे पालकमंत्री,. नाम. श्री. दीपक केसरकर व महाराष्ट्र राज्याचे
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री
नाम. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
या कार्यक्रमास ईडमिशन व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन साबळे, , मुंबई मनपा माजी नगरसेवक शैलेश परब,.विशाल फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, , कोल्हापूर विभागाचे
पत्रकार अधिस्विकृती समिती, संचालक गजानन नाईक, , अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, ,
दत्तगुरु डेव्हलपर्स प्रोप्रा उदय भोसले, . सिंधुदुर्ग बार असोसिएशन जिल्हाध्यक्ष अॅड. परिमल नाईक, , भोसले नॉलेज सिटी चे कार्यकारी अधिकारी श्री. अच्युत सावंतभोसले, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील,
सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष. उमेश तोरस्कर हे असून स्पर्धेचे पुरस्कार वितरण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पत्रकार संघ सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धेमध्ये यावर्षी डिजिटल मीडियाचेही संघ सहभागी होणार आहेत तरी या क्रिकेट स्पर्धेत क्रीडाप्रेमी आणि पत्रकार मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर चराटकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर तसेच क्रिकेट स्पर्धा समिती प्रमुख प्रवीण मांजरेकर आणि सचिन रेडकर यांनी केले आहे
या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी 3 मार्चला सकाळी ९:३० वाजता सावंतवाडी जिमखाना मैदानावर होणार आहे तर विजेत्यांना पारितोषिक वितरण सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी कार्यकारणी सदस्य आणि पत्रकार प्रेमीं नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
Home आपलं सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे आज जिमखाना मैदानावर होणार जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आचार्य बाळशास्त्री...


