शेती बागायती व फळझाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान

गुळदूवे – आजगाव परिसरातील शेतकऱ्यांनी लक्ष वेधले

सावंतवाडी,दि.२ मार्च 
चिरेखाणी सुरू आहेत. त्या कायदेशीर कि बेकायदेशीर आहेत. हे महसूल विभागाने पाहायला हवे पण शेती बागायती व फळझाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे गुळदूवे – आजगाव परिसरातील शेतकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

आजगाव, गुळदुवे गावांच्या सीमेनजीक मळेवाड गावात सुरु असलेल्या चिरेखाणीमुळे
गुळदुवे गावातील फळपीक बागायती, शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर चिरेखाणीचा धुरळा नाकातोंडातून शरीरात जातो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागे होऊन समाजोपयोगी उपाययोजना करावी, अशी त्रस्त रहिवाशांची मागणी आहे.

गुळदुवे गावातील बागायतदार- रहिवासी सुरेश
केदार, कमलाकांत कोल्हे, किशोर केदार, प्रभाकर कोल्हे,रुद्राजी केदार, पुंडलिक केदार, रोहन केदार, उत्तम केदार, शशिकांत केदार, मोहन काळोजी, रमेश केदार,चक्रदार केदार, रोहन केदार आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या
पत्रकात असे नमूद केले आहे.
गुळदुवे गावातील शेतकरी बांधवांची शेती, फळपीक बागायती ही आजगाव, गुळदुवे,
मळेवाड गावात असून त्याला लागून गुळदुवे, आजगाव सीमेवर मळेवाड गावात चिरेखाणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धुरळा होऊन आंबा, काजू,नारळ आदी झाडांवर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव
होऊन उत्पन्नदायी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी, तहसीलदार, प्रांताधिकारी,खनिकर्म, प्रदूषण अधिकारी आदींना निवेदनाद्वारे कळविलेले
आहे. मात्र, कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने जलदगतीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.