सावंतवाडी,दि.२ मार्च
फूड्स अँड इंन्स लि. आयोजित शाश्वत शेती उपक्रमांतर्गत कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दि. ६ मार्च सकाळी १० वा. वेंगुर्ले सिध्दीविनायक मंगल कार्यालय भटवाडी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे,राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित श्री. माधव महाजन आंबा बागायतदार आणि उद्योजक संचालक : आगोम औषधालय, आगोम निर्मिती (कॅनिंग युनिट), अनुमा वाईन्स. कृषी भूषण श्री. बाळकृष्ण गाडगीळ, फूडस चे व्यवस्थापकीय संचालक
श्री. मिलन दलाल उपस्थित राहणार आहेत.