टाळंबा पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात कंपाउंड वॉल चे सुरू असलेल्याकामाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप

काँग्रेसचे पदाधिकारी विजय प्रभू संतोष मुंज आक्रमक

कुडाळ, दि. २ मार्च 

आंबडपाल येथे असलेल्या टाळंबा पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात कंपाउंड वॉल चे सुरू असलेल्याकामाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी करीत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारत घेराव घातला.. हे काम कसे निकृष्ट आहे याची प्रत्यक्ष जाग्यावर पाहणी करायला लावली.. टाळंबा कार्यालया च्या आवारातील कंपाउंडवाँलचे काम निकृष्ट सुरू असल्याबाबत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू संतोष मुंज आदींनी गुरुवारी कार्यकारी अभियंता यांची भेट घेत चर्चा केली मात्र कार्यकारी अभियंत्यांनी आपल्याला योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी केला आणि आज शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांसह या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालीत जाब विचारला आवारात सुरू असलेले काम निकृष्ट असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच कार्यालयातील सुशोभीकरणाच्या कामालाही आक्षेप घेतला.. त्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी केली तसेच अधिकाऱ्यानी आंम्हाकाँग्रेस पदाधिकाऱ्यांना योग्य वागणूक दिली नाही याबाबत धारेवर धरले या कार्यालयात येणारे कर्मचारी येतात जातात कुठे याबाबत विचारणा केली विजय प्रभू यांनी हालचाल रजिस्टर ची मागणी केली.. हालचाल रजिस्टर तपासण्यात आले या हालचाल रजिस्टर मध्ये नोंदी नसल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.. याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आम्ही कागदपत्र पाडून तुमच्यावरच कारवाई करायला लावू असे वक्तव्य केले असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला व याबाबत संबंधितावर कारवाई करा अशी मागणी केली। तब्बल तीन तास काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरीत जाब विचारला.. त्यानंतर संबंधित कामाची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली. त्यावेळी झालेले काम कसे निकृष्ट आहे हे दाखवण्यात आले याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.