शिरोड्याकडे जाणारी एसटी बस मळगाव घाटीत ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाला साईड देताना गटारामध्ये कलंडली सुदैवाने प्रवासी सुखरूप

सावंतवाडी दि.२ मार्च
सावंतवाडी एसटी डेपोतून शिरोड्याकडे जाणारी एसटी बस सकाळी मळगाव घाटीत ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाला साईड देताना गटारामध्ये कलंडली सुदैवाने प्रवासी सुखरूप बचावले.
सावंतवाडी डेपोतून सकाळी शिरोडा येथे जाताना एका ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाला साईड देताना मळगाव घाटीत रस्त्याच्या कडेला गाडी घसरल्याने गटारात साईडला कलंडली .या एसटीमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते मात्र सर्व सुदैवाने ते बचावले. नंतर ही एसटी बस बाहेर काढून बस स्थानकात आणण्यात आली असे डेपो मॅनेजर यांनी बोलताना सांगितले.