विज्ञान दिनाविषयी सविस्तर मार्गदर्शन

वेंगुर्ला ,दि.२ मार्च

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वृद्धिगत करणे, संशोधनास चालना देणे, विज्ञान क्षेत्रात नविनता निर्माण करणे यासाठी हा विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी विज्ञान दिन हा ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान‘ या थीमनुसार साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्रा.राजाराम चौगले यांनी दिली.

यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.संजिव चमणकर, पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख प्रा.डी.बी.राणे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.एम.पाटोळे, प्रा.बी.एम.भैरट, प्रा.विवेक चव्हाण, प्रा.अजितकुमार नरगच्चे, प्रा.एस.एच.माने, संजय परब, विलास सणगर व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.डी.बी.राण यांनी रमन स्पेक्ट्रोस्कोपी विषयी माहिती दिली. तर प्रा.व्ही.एम.पाटोळे यांनी जीवनात विज्ञानाचे महत्व सांगितले.