काजू हमीभावासाठी शिक्षणमंत्री श्री.दीपक केसरकर प्रयत्नशील – श्री. अण्णा केसरकर यांची माहिती

सावंतवाडी दि.२ मार्च
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात व अन्य भागात सर्वत्र शेतकरी, कष्टकरी, ग्रामस्थांनी काजू लागवड केली असून हे काजू उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च, मिळणारे उत्पादन याचा मेळ बसत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकरी व कामगार संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी निवेदन देऊन, शासनाने कमीत कमी दोनशे रुपये हमीभाव द्यावा. अशी आग्रही मागणी केली.
यावेळी या भागाचे आमदार तथा शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य नफा मिळत नाही गोवा सरकारने दीडशे रुपये हमीभाव आपल्या राज्यात काजूला दिला असून आपण कोकणातील शेतकऱ्यांना २०० रुपये हमीभाव देण्यास प्रयत्न करावा जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटना ही रास्त मागणी करीत आहेत. अशा स्वरूपाचे लेखी पत्र शेतकरी कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या निवेदनासोबत श्री. दीपक केसरकर यांनी लेखी मागणी केली आहे.
वसंत केसरकर अध्यक्ष यांना कृषी व शिक्षण मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करून हमीभाव देण्याचे आश्वासन दिले आहे लवकरच हमीभावाची घोषणा होईल अशी अपेक्षा शेतकरी कामगार संघटना, सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी व्यक्त केली.