आंबोली गावठाणवाडी तील जमीन आमच्याच वहीवाटत आहे , त्यामुळे मालक आम्हीच संतोष राऊत आणि डुबाजी राऊत यांनी केला दावा

सावंतवाडी,दि.२ मार्च
आंबोली गावठाणवाडी ,फौजदारवाडी व रमाईनगर येथे करण्यात आलेले उपोषण हे, कथित आहे असे जमीन वहिवाटदार संतोष राऊत आणि डुबाजी राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आमच्या कुटुंबात १५ एकर जमीन वाटपात येणार असून आमची या जमिनीवर वहीवाट आहे असे त्यांनी सांगितले.

आंबोली गावठाणवाडी तील जमीन कबुलायतदार गावकर जमीन असून ती जमीन आमची वंशपरंपरागत वहिवाटीत आहे.आमचे पुर्वज कबुलायतदार गावकर होते. शंकर भागोजी राऊत, रामा राया राऊत ,रघु राऊत यांची कबुलायत होती. तीच जमीन आमच्या डुबा राऊत यांच्या वहीवाटीत होती आणि आहे. तीच जमीन आम्ही कुटुंबाने विकलेली नसून आमच्या अजून वहिवाटीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आमचे राऊत कुटुंब एकत्र असून
सर्व जमीन आमच्या कुटुंबात आहे. सन १९९९ साली महाराष्ट्र शासन झाली .त्यानंतर आंबोलीत अतिक्रमणे चालू आहेत. माझे वडील रामा राऊत यांच्या नंतर हि जमीन अजूनही आमच्या ताब्यात ठेवण्यात आलेली आहे, असे संतोष राऊत आणि डुबाजी राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे.
संतोष राऊत, आणि डुबाजी राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे,हि जमीन आमच्या ताब्यात आहे, आज हि शासन, महसूल असली तरी आज आंबोलीचा शासन निर्णय होवून ६५४ कुंटूब सर्व्हेक्षण मध्ये घेतली असून आमच्या कुटुंबात १५ एकर जमीन वाटपात येणार आहे. त्यामूळे आमची सर्व्हे नं. २३, मध्ये वहीवाट आहे, असे आमचे म्हणणे आहे, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.