संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ स्थापन

0

सिंधुदुर्ग नाभिक संघटना अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळाचे मानले आभार

मालवण,दि.१३ जानेवारी
नाभिक समाजाच्या कल्याणासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. गेली 30 वर्षे महामंडळ स्थापनेचा निर्णय प्रलंबित होता. मात्र निर्णयाची अंमलबजावणी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजाला दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रीमंडळाचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी सांगितले

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात चव्हाण म्हणाले, या महामंडळ भागभांडवल साठी 50 कोटी तरतूद करून 12 पदेही मंजूर करण्यात आली आहेत. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असेल.महामंडळाच्या माध्यमातून 5 लाख पर्यंत कर्ज नाभिक बांधवाना व्यवसाय करण्यासाठी मिळेल. महामंडळ २० टक्के आर्थिक भार उचलेल. लाभार्थीचा सहभाग ५ टक्के, बँकांचा ७५ टक्के असेल. पाच लाखांपर्यंतचे कर्ज या योजनेत दिले जाईल, व्याजदर सहा टक्के असेल आणि पाच वर्षांत परतफेड करावी लागेल. एक लाखापर्यंतचे थेट कर्ज दिले जाईल. त्यासाठी लाभार्थीस स्वतःचा एकही पैसा द्यावा लागणार नाही. ४८ समान हप्त्यांमध्ये या कर्जाची परतफेड करावी लागेल. मुदतीनंतर थकीत कर्जावर चार टक्क्चे व्याज आकारले जाईल. बँकांकडून दहा लाखांपर्यंतचे कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या समाजबांधवांच्या व्याजाची रक्कम महामंडळामार्फत जमा केली जाईल, दहा ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या गट कर्जाबाबतही असेच साहाय्य महामंडळ करेल. समाजातील तरुण- तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. अश्या अनेक कल्याणकारी योजना सुविधा असणार आहेत.

नाभिक समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासन मंत्रीमंडळाचे आभार मानत असल्याचे सिंधुदुर्ग नाभिक संघटना अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी सांगितले.