भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार-पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग दि २

आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा सर्व भक्तांवर कृपाआशीर्वाद आहे. या कृपाशीर्वादामुळे सर्वजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. प्रत्येक भाविकाला चांगल आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे. नवसाला पावणारा आई भराडी देवी सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज कुटुंबीयांसह आई भराडी देवीचे दर्शन घेतले. आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आनंद आंगणे व काका आंगणे यांच्या हस्ते पालकमंत्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते.