काजू बागेत गाय व वासरु गेल्याने कोयत्याने पायावर वार..

कणकवली तालुक्यातील घटना

कणकवली दि.२ मार्च(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील एका गावात काजू बागेमध्ये गाय व वासरु गेल्याचा राग आल्याने बाग मालकाने त्या मुक्याजनांवर कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना घडताच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवली पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गाय व वासरु गंभीर जखमी झाले आहे. जनावरांवर वार करणाऱ्या त्या काजू बाग मालकाला पोलिसांनी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्यात आणले होते. त्याचबरोबर त्या जनावरांच्या मालकांनाही पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलून घेतले .

कणकवली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील,पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जावून परिस्थिती नियंत्रणात आणली.