नांदगाव पंचक्रोशीत पोलिओ डोस लसीकरण केंद्रांवर मोहीम

केंद्रांवर ५ वर्षाखालील बालकांना घेवून पालकांनी लावली हजेरी

कणकवली दि.३ मार्च(भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिओ डोस लसीकरण केंद्रांच्या आरोग्य विभागाच्या वतीने मोहीम ३ मार्च रोजी हाती घेण्यात आली आहे.नांदगाव पंचक्रोशीत असलदे, कोळोशी,आयनल,नांदगाव,तोंडवली, ओटव या गावातील पोलिओ डोस लसीकरण केंद्रांवर मोहीम राबविण्यात येत आहे.या केंद्रांवर ५ वर्षाखालील बालकांना घेवून पालकांनी हजेरी लावली आहे.

नांदगाव पंचक्रोशीत आज शून्य ते पाच वयोगटातील मुलांना पोलिओ डोस पाजण्यात आला.सकाळीच पालकांनी बालकांना डोस पाजण्यासाठी लगतच्या पोलिओ डोस लसीकरण केंद्रांवर येत आहेत. ‌‌लहान बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येत आहेत.आज आंगणेवाडी जत्रा असल्याने पालकांनीही सकाळी लवकर उपस्थित राहून आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजून घेतला.त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व केंद्रांवर नियोजन करण्यात आले होते.