बांधकाम खाते सेवकांची सहकारी पतपेढीसाठी सहकार वैभव व परिवर्तन पॅनलमध्ये लढत

0

कणकवली १३ जानेवारी (भगवान लोके)

बांधकाम खाते सेवकांची सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान झाले. कणकवली येथे शासकीय विश्रामगृह येथे मतदानासाठी बांधकाम खाते सेवकांनी गर्दी केली होती.
सहकार वैभव पॅनल व परिवर्तन पॅनल अशी दोन पॅनल आमने सामने असून 11 पैकी सहकार वैभव पॅनलचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत तर 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. बांधकाम खाते सेवकांची सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी या संस्थेचे एकूण 1124 मतदार असून एकूण 10 केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सावंतवाडी व कुडाळ या तीन केंद्रांवर मतदान झाले. कणकवलीत 75 तर कुडाळ आणि सावंतवाडी केंद्रावर प्रत्येकी 92 मतदार आहेत.