आरोग्य व्यवस्था,बंदोबस्तासाठी असणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले समाधान
कणकवली दि.३ मार्च(भगवान लोके)
आंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळच्या सुलभ स्वच्छतागृह बांधकाम विभागाच्या मार्फत बांधण्यात आले आहे. या प्रसाधनगृहामध्ये १३ युरोपियन वॉटर क्लोसेट, १६ इंडियन वॉटर क्लोसेट, ८ स्नानगृह, २ लॉकर खोली, ४ अपंग शौचालय, ४ चेंजिंग खोली, १ हिरकणी कक्ष, १६ वॉशबेसिन, १४ युरिनल्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लाखो भाविकांनी यात्रेनिमित्त हजेरी लावली,आरोग्य व्यवस्था,बंदोबस्तासाठी असणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले समाधान व्यक्त केले.तसेचआंगणेवाडीत सुंदर स्वच्छतागृह झाले..भाविकांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
या यात्रेसाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग या प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने सेवेत असतात या स्वच्छ आणि चांगल्या स्वच्छतागृहामुळे या कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे
पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख ८१ हजार ७४५ रुपये खर्च करत महिला व पुरुषांसाठी हे प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे.कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत असे प्रसाधनगृह झाले,त्याबद्दल त्यांचे कौतुक केलं जात आहे.