साहित्य अकादमी दिल्ली महोत्सवात मालवणी बोली तील काव्य वाचनासाठी सावंतवाडी कारीवडे येथील कवी प्रोफेसर डॉ नामदेव गवळी यांना निमंत्रित

सावंतवाडी, दि.३ मार्च

साहित्य अकादमी दिल्ली येथे येथे मालवणीसाठी प्राध्यापक नामदेव गवळी निमंत्रित भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातील साहित्य अकादमी या राष्ट्रीय संस्थेने 11 ते 16 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे बहुभाषिक साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे या साहित्य महोत्सवात मालवणी बोली तील काव्य वाचनासाठी सावंतवाडी कारीवडे येथील कवी प्रोफेसर डॉ नामदेव गवळी यांना निमंत्रित केले आहे.
प्रोफेसर डॉक्टर नामदेव गवळी हे महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेच्या आनंदबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे गेली ३० वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या मालवणी बोलीतील भातालय या काव्यसंग्रहाला 12 राज्य पुरस्कार व इतर सन्मान प्राप्त झाले असून त्यातील कविता मुंबई व शिवाजी विद्यापीठातील स्वायत्त महाविद्यालय विवेकानंद कॉलेज येथे पदवी अभ्यासक्रमात आहे
साहित्य अकादमीच्या या साहित्य महोत्सवात शंभर पेक्षा जास्त भारतीय प्रादेशिक भाषा मधील साहित्यिक सहभागी होणार आहेत डॉक्टर नामदेव गवळी यांच्या भातालयावर प्राध्यापक प्रवीण बांदेकर प्राचार्य गोविंद काजरेकर प्राध्यापक भाऊ गोसावी कवी अजय कांडर प्राध्यापक मोहन कुंभार डॉक्टर रणधीर शिंदे आदींनी लेखन केले असून हा काव्यसंग्रह लोक वाडमय गृहाने प्रकाशित केला आहे.
ग्रामीण साहित्य हे अस्सल भूमीचे व जन्मजात असे साहित्य आहे की आपल्या सर्व साहित्याचे ते मुख्य अंग आहे जागतिकीकरणामुळे अनेक ग्रामीणत्व परंपरा नष्ट होत आहेत यासाठी साहित्य अकादमीने राष्ट्रीय साहित्य पुरस्कार वितरण प्रख्यात उर्दू लेखक गुलजार यांचे व्याख्यान व भारतीय बहुभाषिक साहित्यिक कार्यक्रम 11 ते 16 मार्च या दरम्यान आयोजित केले आहे मालवणी लेखन समवेत डॉक्टर नामदेव गवळी यानी मालवणी मुलखातील लोक साहित्यावर डॉक्टरबाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी संशोधन केले आहे साहित्य अकादमीच्या निमंत्रणा बाबत महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी या स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.